‘बीएचआर’च्या जळगाव कार्यालयाला ठोकले सील
By Admin | Updated: May 3, 2015 00:53 IST2015-05-03T00:53:10+5:302015-05-03T00:53:10+5:30
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट (बीएचआर) पतसंस्थेच्या अकोला शाखेतील चार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पतसंस्थेचे

‘बीएचआर’च्या जळगाव कार्यालयाला ठोकले सील
अकोला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट (बीएचआर) पतसंस्थेच्या अकोला शाखेतील चार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पतसंस्थेचे जळगाव येथील कार्यालय शुक्रवारी सील केले. तारीख नसलेले २२ धनादेश पोलिसांनी जप्त केले.
‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अकोला शाखेत ठेवीदारांची ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांची फसवणूक झाली. गजानन रामसा धामंदे यांनी ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या स्वर्णलक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेमध्ये ११ टप्प्यांत १९ लाख रुपयांची रक्कम ठेव म्हणून जमा केली होती. पतसंस्थेने सुरुवातीला काही दिवस व्याज दिले, मात्र नंतर देणे बंद केले होते. त्यामुळे धामंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी संचालकांसह, अधिकारी व कर्मचारी अशा ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. १३ आरोपींना जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले व पतसंस्थेचे जळगाव कार्यालय सील केले. (प्रतिनिधी)