हॉटेलसह ६० गाळ्यांना ठोकले सील

By Admin | Updated: June 30, 2016 02:40 IST2016-06-30T02:40:39+5:302016-06-30T02:40:39+5:30

परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे.

Sealed with 60 grams in the hotel | हॉटेलसह ६० गाळ्यांना ठोकले सील

हॉटेलसह ६० गाळ्यांना ठोकले सील


नवी मुंबई : परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. शहरातील ६० हॉटेल, बेकरी व खाद्यपदार्थांची दुकाने सील केली आहेत. पालिकेच्या स्थापनेपासून ही सर्वात मोठी कारवाई असल्याने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही नवी मुंबईची स्मार्ट सिटी होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरोधात पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण हटविण्याबरोबर पालिकेचा महसूल बुडविणाऱ्यांवरही कडक कारवाई सुरू केली आहे. शहरामधील हॉटेल, मिठाईची दुकाने, बेकरीसह फास्ट फूडचा व्यवसाय करणाऱ्यांनी पालिकेकडून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहेत. परवान्याचे नियमितपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यावसायिकांनी पलिकेचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू केला आहे. अशा विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. परवाना विभागाचे अधिकारी दत्तात्रेय नांगरे व त्यांच्या पथकाने पालिकेचा परवाना न घेतलेल्या सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. नोटीस पाठवूनही परवाना न घेणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येत आहेत. गत दोन आठवड्यामध्ये एकूण ६० हॉटेल व इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. वाशीमध्ये सर्वाधिक १५ दुकाने सील केली आहेत. द बेक शॉप, बेंगलोर आय्यंगार बेकरी, माँजिनीज, बिकानेर या नामांकित दुकानांवरही कारवाई केली आहे. नेरूळमधील झामासह सेक्टर ६ मधील गोल्डन गेट बारवरही कारवाई केली आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रथमच परवाना न घेणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत पालिकेच्या नोटीसकडे गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे गाळे सील झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे.
परवाना असेल तरच व्यवसाय करता येईल अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी परवानगीसाठी धावपळ सुरू केली आहे. पालिकेच्या परवाना
विभागात हॉटेल, स्वीट्स व इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठीचे अर्ज मोठ्याप्रमाणात येवू लागले आहेत. (प्रतिनिधी)
>कारवाईचा तपशील
वाशी : आलिशा हॉस्पिटॅलिटी, ज्युस फॅक्टरी, के. जी. बी. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, चायनीज फूड, पिझेरीया हाऊस, वैष्णवी फूड्स, ला ग्रीलस चायनीस स्पाईस, बिर्याणी दरबार, गवई हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस, कॉम्बो ब्रेकर, चायना लँड, इटालियन हाऊस, फास्ट फूड फॅक्टरी, केरला फूड एक्स्प्रेस, अहम चिकन एल एल पी, रॉक वेले डेली
कोपरखैरणे : व्हिक्टोरीया हॉटेल, रसोई फाईन, डाईन, सद्गुरू हॉटेल, बिर्याणी दरबार, फ्रेंड सर्कल ज्युस सेंटर, सहजानंद स्वीट्स, झामा स्वीट्स, कॅफे कॉफी डे, अयंगार बेकरी, हॉट चीप्स
सानपाडा :
द बेक शॉप, बेंगलोर अयंगार बेकरी, के पी के फायस्टार, इडली मी, सब वे (टेंडर फूड्स), हॉटेल बालाजी, बिकानेर स्वीट्स
बेलापूर : रिबन्स अँड बलुन्स केक शॉप, अमालगमेंटेड क्वीन कॉफी ट्रेडिंग कंपनी, इन्स्पिरेशन फूड्स, बर्डिस केक शॉप, जे. व्ही. व्ही. हॉस्पिटॅलिटी, रॉयल अरेबिया, चेतक स्वीट्स, शिवशक्ती फास्ट फूड अँड ज्युस कॉर्नर, लीला केक शॉप, माँजिनीज, नित्यानंद फॅमिली रेस्टॉरंट, बेंगलोर अय्यंगार बेकरी

Web Title: Sealed with 60 grams in the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.