शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Amol Mitkari : जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरींनी सांगितले नेमके काय घडले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 12:46 IST

NCP Amol Mitkari : शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली.

मुंबई - विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलने याआधीही केली जात होती. विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं. 

शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. 

"शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली"

शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधानाला धरून नाही असं मिटकरींनी म्हटलं आहे. 

"अंगावर आलात तर शिंगावर घेऊ"

"महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले. आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते. ते आमच्यावर आंदोलन करून आरोप करत होते. तेव्हा आम्ही बाजुने जात होतो. त्यांना उत्तरही देत नव्हतो. आज आम्ही पहिले तिथे होतो. त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ", असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले.  

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण