छाननी समितीचे पुनर्गठन
By Admin | Updated: June 30, 2015 03:21 IST2015-06-30T03:21:13+5:302015-06-30T03:21:13+5:30
राज्यातील अनेक संस्था, संघटना, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये व खासगी व्यक्ती यांच्याकडे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे आहेत

छाननी समितीचे पुनर्गठन
मुंबई : राज्यातील अनेक संस्था, संघटना, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये व खासगी व्यक्ती यांच्याकडे राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे आहेत. या महत्त्वाच्या व दुर्मीळ कागदपत्रांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय पुरालेखागार, केंद्र शासन यांच्याकडून अर्थसाहाय्य केले जाते. याबाबतच्या प्रस्तावांची छाननी, तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय छाननी समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे.
या समितीत मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. मंजिरी कामत, एलफिन्स्टन महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. भावना पाटोळे यांचा समावेश आहे. राज्यभरातील अर्ज, प्रस्तावांचे अर्थसाहाय्य योजनेसाठी निकषांची पूर्तता करणे, संघटना, संस्था, व्यक्ती यांची वर्तमान स्थिती पडताळणे आणि प्रकल्पाचे महत्त्व, सुसाध्यता तपासणे असे या समितीचे कार्यस्वरूप असेल.