शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदी दरावरून पेच, पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:59 IST

दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

मुंबई - दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शेतकरी संप आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध खरेदी दरात वाढ केली होती. ग्राहकांवर अतिरिक्त बोजा न टाकता गायीचे दूध २७ तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रति लीटर अशी एकूण तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढीव दर देता येणार नसल्याचे सांगत राज्यातील दूध संघांनी दूधाचे संकलन बंद करून आंदोलन करण्याचाच इशारा दिला होता. त्या वेळी सरकारने बैठका घेत विषय तात्पुरता मिटवला होता. मात्र, दूध खरेदी दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. सध्या औरंगाबाद येथील शेतकºयांनी मोफत दूध देण्याचा मार्ग अवलंबिला आहे. तर किसान महासंघाने दूधपुरवठा बंद करत पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. दुधाच्या खरेदी दरावर राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हमीभाव नसताना दुधाच्या खरेदी दरात वाढ शक्य. एकतर सरकारने दुधाचे दर वाढवावेत किंवा खरेदी दरातील वाढीसाठी दूध संघांना अनुदान द्यावे, अशी दूध संघांची भूमिका आहे. राज्यातील बहुतांश दूध संघांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राज्य सरकारची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी ‘आरे’ हाच एक ब्रँड बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. मात्र, त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज्यात रोज तीन कोटी लीटर दुधाची आवश्यकता असताना उत्पन्न मात्र ७५ लाख लीटर इतकेच आहे. मात्र, एकीकडे दुभत्या जनावरांवरील खर्च वाढत असताना खरेदी दरातील घसरणीमुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :milkदूधMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीGovernmentसरकार