महाराष्ट्र सदन चपाती प्रकरणावर पडदा

By Admin | Updated: August 19, 2014 13:55 IST2014-08-19T13:15:34+5:302014-08-19T13:55:12+5:30

महाराष्ट्र सदनातील एका कर्मचा-याला जबरदस्तीने चपाती भरवून त्याचा रोजा मोडल्याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.

The screening of Maharashtra Sadan Chapati case | महाराष्ट्र सदन चपाती प्रकरणावर पडदा

महाराष्ट्र सदन चपाती प्रकरणावर पडदा

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - 'रमजानच्या महिन्यात महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती खायला लाऊन त्याचा रोजा मोडल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तक्रार दाखल झाली नसल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले असून याचिका रद्द बातल झाल्याने प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता दिसत आहे. 
महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी वागणूक, राहण्याची व खाण्यापिण्याची निकृष्ट दर्जाची सोय यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी गेल्या महिन्यात सदनातील कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवली होती. मात्र तो कर्मचारी मुसलमान होता व तेव्हा त्याचा रमजानचा उपवास सुरू असल्याने या प्रकरणी मोठा गदारोळ माजला होता.  भाजप-शिवसेनेचे नवनियुक्त  खासदार निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात वास्तव्य करत होते. मात्र त्यांना तेथे चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नव्हत्या. या गैरसोयींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना वारंवार भेटण्याचा पयत्न करीत होते. मात्र, निवासी आयुक्तांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. एकदा मलिक यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली मात्र ते भेटलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावरील राग कॅंटीनच्या मॅनेजरवर निघाला. जेवण नीट नसल्यामुळे सेनेचे खासदार राजन विचारे यांनी मॅनेजरला बोलावले आणि पोळी खावून दाखविण्यास सांगितले. त्याने पोळी खाल्ली नाही म्हणून विचारे यांनी स्वतः मॅनेजरच्या तोंडाला पोळी लावली. मात्र तो मुस्लीम असून त्याने रोजा ठेवला आहे याची माहिती त्यांना नव्हती. रोजाचा उपवास मोडल्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बंद पाडले. याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. आज त्यावर सुनावणी झाली असता अखेर ही याचिका रद्दबातल ठरवण्यात आली. 
 

Web Title: The screening of Maharashtra Sadan Chapati case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.