बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ
By Admin | Updated: June 28, 2014 22:40 IST2014-06-28T22:28:04+5:302014-06-28T22:40:39+5:30
बैलबंडी मागे चालणार्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले.

बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ
उंद्री : लगतच असलेल्या डासाळा येथील गाडेकरी-राउती शिवारात बैलबंडी मागे चालणार्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना २८ जून रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान शेतकरी परशुराम ठाकरे यांच्यासमोर घडली. डासाळा येथील रहिवासी परशराम ठाकरे यांचे शेतात शनिवारी सकाळी परशुराम ठाकरे हे आपल्या शेतावर काम करण्यासाठी बैलबंडी घेवून जात असताना आत्माराम जाधव यांच्या शेतात अचानक बिबट्याने बैलबंडीमागे चाललेल्या गायीवर हल्ला केला. बिबट्याचा धुमाकुळ बघताच परशराम ठाकरे यांनी आरडाओरड करुन बिबट्यावर दगडफेक केल्याने बिबट्या पळून गेला व गाय वाचली.