शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनला सुरू, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:21 IST

School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले.

मुंबई :  विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

पालकांना शाळा नक्की कधी सुरू होणार याचा अंदाज असेल तर त्यांना सुट्यांचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. याच हेतूने १५ जूनला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. विदर्भामध्ये जूनमध्ये तापमान वाढलेले असल्याने तेथील शाळा ३० जूनला सुरू होतील. 

शालेय शिक्षणमंत्री म्हणाले..     विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.     विद्यार्थ्यांची सायकोमॅट्री चाचणी सहावीपासून घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ लाख विद्यार्थ्यांची चाचणी.     बालभारती पुस्तकाचे दर वाढले तरी सरकारी शाळांमधील ९० टक्के मुलांना विनामूल्य पुस्तके दिली जातील.     खासगी शाळा भरमसाट फी आकारतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल.आता पुस्तकातच वहीयापूर्वी दारिद्र्य रेषेखालील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जात होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जातील. तसेच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातच प्रत्येक धड्याच्या शेवटी वह्यांची पाने जोडली जातील, असेही केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणDeepak Kesarkarदीपक केसरकर