एचआयव्हीबाधितांच्या प्रवेशाने शाळेला रामराम!

By Admin | Updated: July 16, 2014 02:59 IST2014-07-16T02:59:29+5:302014-07-16T02:59:29+5:30

स्वत:ला आधुनिक म्हणून मिरविणाऱ्या गोव्यात एचआयव्हीबाधीत विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाने नवा वादंग निर्माण झाला आहे.

School Ramram rescued by HIV! | एचआयव्हीबाधितांच्या प्रवेशाने शाळेला रामराम!

एचआयव्हीबाधितांच्या प्रवेशाने शाळेला रामराम!

मडगाव/रिवण : स्वत:ला आधुनिक म्हणून मिरविणाऱ्या गोव्यात एचआयव्हीबाधीत विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाने नवा वादंग निर्माण झाला आहे. एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावरून १६ पालकांनी त्यांच्या मुलांचे दाखले शाळेतून काढून घेतले आहे. मंगळवारी आणखी १० पालकांनी त्यांच्या मुलांचे दाखले काढण्यासाठी अर्ज करून एकप्रकारे त्यांच्यावर अजूनही कसा गैरसमजाचा पगडा आहे, हेच दाखवून दिले आहे.
पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जुझे आफोन्सो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नेमक्या किती पालकांनी मुलांना शाळेतून काढले आहे, याची माहिती नसली, तरी काही पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून काढले आहे, असे ते म्हणाले.
रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये एचआयव्हीबाधित २३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्याला सुरवातीपासून पालक विरोध करत आहेत. शाळेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत १९ पालकांनी त्यांच्या मुलांचे नाव शाळेतून काढून घेण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी १६ मुलांचे दाखले मंगळवारी देण्यात आले. या १६ विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी स्थानिक असून इतर विद्यार्थी बाहेरून आलेल्या कामगारवर्गाच्या कुटुंबातील आहेत.
मुलांना शाळेतून काढण्यास इच्छुक असलेल्या पालकांची संख्या ४0 वर जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत माहिती मिळविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक फा. जेरी फर्नांडिस यांच्याशी
संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: School Ramram rescued by HIV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.