शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: February 15, 2017 03:10 IST2017-02-15T03:10:23+5:302017-02-15T03:10:23+5:30

महापालिकेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीला खडू आणायला सांगत तिचा विनयभंग करण्यात आला. शाळेमध्ये रंगाचे काम करण्यासाठी

School molestation | शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे : महापालिकेच्या शाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीला खडू आणायला सांगत तिचा विनयभंग करण्यात आला. शाळेमध्ये रंगाचे काम करण्यासाठी आलेल्या आरोपीने हे कृत्य केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रामनगर भागात सोमवारी घडली. हा प्रकार समजल्यानंतर शाळा प्रशासनाने तक्रार करु नका, अशी विनंती नातेवाईकांना केल्याचे समोर आले आहे. मोरेश्वर काने असे अटक आरोपीचे नाव आहे.
पिडीत मुलगी आठ वर्षांची असून ती रामनगर परिसरातील मनपा शाळेमध्ये शिकते. नेहमीप्रमाणे सोमवारी ही मुलगी शाळेमध्ये गेली होती. मधल्या सुटीत कार्यालयासमोर खेळत असताना आरोपीने तिला ‘खडू घेऊन ये’ असे सांगितले. कार्यालय रिकामे असल्याचा फायदा घेत त्याने मुलीसोबत अश्लिल कृत्य केले. मुलीला मारण्याची धमकी आरोपीने दिली. घरी आल्यानंतर रडतच आईला घडलेला प्रकार सांगितला. (प्रतिनिधी)

Web Title: School molestation