शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

स्कूलबस, मालवाहतूक बुधवारपासून होणार ठप्प?

By admin | Updated: November 14, 2016 05:45 IST

सरकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला कमाल १० हजार, तर आठवड्याला कमाल २० हजार रुपये बँकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. यामुळे आर्थिक कोंडी

मुंबई : सरकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला कमाल १० हजार, तर आठवड्याला कमाल २० हजार रुपये बँकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या स्कूलबसचालक व मालवाहतूकदारांनी बुधवारपासून या सेवा बंद होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वेठीला धरले जाणार आहे.बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे देशातील ९० टक्के मालवाहतूक ठप्प झाली असून इंधनासाठी पैसे नसल्याने बुधवारपर्यंत स्कूल व आॅफिसच्या बससेवाही बंद होतील, असे स्कूल बसचालकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. स्कूल बस आणि आॅफिस बसमालकांकडे सुमारे १० गाड्या असतात. त्या चालवण्यासाठी दिवसाला सरासरी २० हजार रुपये लागतात. काही मालकांकडे ३० स्कूल व आॅफिस बस आहेत. त्यामुळे आठवड्याला २० हजार रुपये मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने बस चालवणे कठीण आहे. त्यामुळे बँकेतून दिवसाला किमान २ लाख रुपये काढण्याची सवलत वाहतूकदारांना देण्याची मागणी बॉम्बे गुड्स अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी केली आहे. राजगुरू यांनी सांगितले की, संघटनेने कोणताही बंद पुकारलेला नाही. तर आर्थिक मर्यादेमुळे मालवाहतूक ठप्प पडली आहे. म्हणूनच वाहतूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी एक तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली जाईल. पेट्रोलपंपावर जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबरला संपत आहे. मंगळवारपर्यंत बँकेतून काढण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची गरज आहे, असे स्कूल अ‍ॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे सदस्य रमेश मनिअन यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)