स्कूल बस चालकांचा संप मागे : परिवहन आयुक्तांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:19 IST2017-08-01T05:19:26+5:302017-08-01T05:19:57+5:30
सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणा-या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी घोषित केलेला बंद स्कूल बस चालकांनी मागे घेतला आहे.

स्कूल बस चालकांचा संप मागे : परिवहन आयुक्तांशी चर्चा
मुंबई : सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणा-या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी घोषित केलेला बंद स्कूल बस चालकांनी मागे घेतला आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, सोमवारी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) संप मागे घेतला आहे. परिणामी, सुमारे ८ हजार स्कूल बस चालक-मालक मंगळवारी ‘स्कूल चले हम’ असा नारा देत, विद्यार्थी सेवा सुरू ठेवणार आहेत.
एसबीओएच्या ६ शिष्टमंडळीय सदस्यांनी राज्याचे परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यावर सकारात्मक चर्चा झाली.
सरकारी नियमांची चाचपणी करून, अयोग्य अटींमध्ये सुधारणा करण्यात येईल. न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मुद्द्यांवर सरकार हस्तक्षेप करणार नाही. व्हॅनविषयक सरकारी समिती धोरण सात दिवसांत जाहीर होईल, असे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतल्याची माहिती एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.