शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची संकेतस्थळावर
By Admin | Updated: April 6, 2015 04:10 IST2015-04-06T04:09:13+5:302015-04-06T04:10:59+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांच्या तीनही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसूची

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची संकेतस्थळावर
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांच्या तीनही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसूची विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांना मंगळवारपर्यंत मंडळाकडे आक्षेप नोंदवता येणार आहे.
चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार २२ मार्च घेण्यात आली. चौथी परीक्षेला ९ लाख २७ हजार ७८९ विद्यार्थी तर सातवी परीक्षेला ६ लाख ६७ हजार ६२५ विद्यार्थी बसले होते. परीक्षेनंतर चौथी आणि सातवीच्या प्रत्येकी तिन्ही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसुची www.msepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरसुची प्रसिद्ध झाल्यानंतर यामधील त्रुटींबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडून आक्षेप मागविण्यात येतात. त्यानुसार परिषदेने संबंधीतांकडून परीक्षेतील त्रुटींबाबत आक्षेप मागविले आहेत.
आक्षेपासाठी परिषदेने संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. नमुना अर्जाप्रमाणे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मंगळवार ७ एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिकेतील त्रुटी नोंदवता येणार आहेत. पत्रासह परिषदेच्याmsepune@gmail.com या इ मेल आयडीवरही आक्षेप नोंदवता येणार आहेत.