शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 20:12 IST

परदेशातील विद्यापीठांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, आभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी शाखांमधील पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

ठळक मुद्देखुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी : प्रत्येक वर्षी २० जागायोजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार अर्जदार विद्यार्थी व पालकाचे उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे 

पुणे : खुल्या प्रवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी विविध शाखानिहाय २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, आभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी शाखांमधील पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. यापार्श्वभुमीवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याबाबतचे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क शासनाकडून भरण्याची राजर्षी शाहू शिक्षणशुल्क फी प्रतिपुर्ती योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.   गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, म्हणून शासनाकडून ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य शासनाने यापूर्वीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. खुल्या प्रवगार्तून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष इतका आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच (२०१८-१९) या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरून यासाठी आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ....................परदेशातील शिष्यवृत्तीसाठीचे प्रमुख निकष१. अर्जदार विद्यार्थी व पालकाचे उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे २. दहावीपासून पदव्युत्तर पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा विचार३. प्रवेश मिळालेल्या विद्यापीठांचे जागतिक नामांकनाचा विचार४. मुलींसाठी ३० टक्के जागा राखीव

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार