शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:35 IST

सुमारे महिनाभरानंतर एमबीए प्रवेशाबाबत न्यायालयाने निर्णय दिला.

ठळक मुद्देदुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणारप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ४ व ५ सप्टेबर रोजी ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरला भेट देणे बंधनकारक

पुणे: राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल)मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले आहे.विद्यार्थ्यांना ३ स्पटेबर ते 18 सप्टेबर या कालावधीत तीन प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत.सुमारे महिनाभरानंतर एमबीए प्रवेशाबाबत न्यायालयाने निर्णय दिला.त्यामुळे उशिरा का होईना अखेर एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.सीईटी-सेलने पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंगळवारी (दि.३)प्रसिध्द केली आहे.पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ४ व ५ सप्टेबर  रोजी ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरला (एआरसी)भेट देणे बंधनकारक आहे. मात्र,१८ ते २१ जुलै या कालावधीत एआरसी सेंटरला भेट देवून प्रवेशाबाबतचे शुल्क जमा केले आहे,अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एआरसी सेंटरला भेट देण्याची आवश्यकता नाही. पहिल्या फेरीतून प्रवेश मिळाल्या विद्यार्थ्यांनी ४ ते ६ सप्टेबर या कालावधीत संबंधित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट  मध्ये जावून प्रवेश घेणे आवश्यक आहे.परंतु,ज्या विद्यार्थ्यांनी १९ ते २२ जुलै या कालावधीत यापूर्वीच प्रवेश घेतला आहे.तसेच त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी प्रवेश मिळाला आहे.त्यांनी पुन्हा प्रवेशासाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची गरज नाही.प्रवेशाची दुसरी फेरी येत्या ७ सप्टेबर रोजी सुरू होणार असून या दिवशी रिक्त जागांची माहिती प्रसिध्द केली जाईल.विद्यार्थ्यांना येत्या ७ व ८ सप्टेबर या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून सबमिशन,कन्फर्मेशन आणि पसंतीक्रम भरता येतील. दुस-या फेरीची प्राथमिक गुणवत्ता यादी ९ सप्टेबर रोजी प्रसिध्द केली जाईल.पात्र,विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत एआरसी सेंटरला भेट द्यावी लागेल. मात्र,एआरसीमध्ये १८ ते २१ जुलै या कालावधीत जावून शुल्क भरले आहे,अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एआरसीत जाण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.तिसरी प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १२ सप्टेबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.विद्यार्थ्यांना तिस-या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.या फेरीची प्राथमिक गुणवत्ता यादी १५ सप्टेंबरला प्रसिध्द होईल. विद्यार्थ्यांना १६ ते १७ या कालावधीत एआरसीला भेट द्यावी लागेल.त्यानंतर प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना १६ ते १८ सप्टेबर या कालावधीत संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाonlineऑनलाइन