शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:09 IST

मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.

मुंबई : मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ, घोषणाबाजी सुरू असताना अस्लम खान यांनी अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलला आणि नंतर त्यांच्यासह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, काँग्रेसचे आसीफ शेख, अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील हे राजदंड उंचावून बराच वेळ सभागृहाला दाखवत होते.अस्लम शेख तेवढ्यावरच थांबले नाहीत ते सदस्यांच्या आसनाजवळ राजदंड घेऊन गेले आणि तो उलटा करून त्यांनी तो काठीसारखा हातात घेतला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना राजदंड परत देण्याची विनंती केली पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गदारोळात कामकाज तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले तेव्हादेखील अस्लम शेख यांनी आणि तिसºया वेळी वारीस पठाण यांनी राजदंडउचलला.तिन्हीवेळा अध्यक्षांच्या खुर्चीत तालिका अध्यक्ष सुभाष साबणे होते. त्यांनी राजदंड उचलणाºया सदस्यांना आधी दोन वेळा कुठलीही समज दिली नाही. तिसºयांदा त्यांनी समज दिली.राजदंड मतदारसंघातनेऊ द्या - आव्हाडसभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. प्रथा परंपरा तोडून मोडून टाकल्या जात असतील आणि राजदंड ही शोभेची वस्तू होत असेल तर मग मला तो मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीकेली.विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचे हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजेमुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावरविरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला, असेही आव्हाड म्हणाले.विधान परिषदेतही गोंधळमराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत कामकाज रोखून धरले. सुरुवातीला दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडण्यास सुरुवात केली. आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांचा प्रश्नशिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या विधवांचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी दुष्काळाकडे स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यावर निवेदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी शाळांच्या अनुदानाचा विषय उपस्थित केला. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वीच कोणत्या शाळा पूर्ण अनुदानासाठी योग्य आहेत, हे जाहीर केले जाईल, असे तावडे म्हणाले. तावडेंच्या निवेदनानंतर तालिका सभापती जगन्नाथ शिंदे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र