गुन्हे अन्वेषणच्या प्रमुखपदी सक्सेना
By Admin | Updated: June 8, 2016 03:46 IST2016-06-08T03:46:38+5:302016-06-08T03:46:38+5:30
आयपीएस अधिकारी आणि ‘फोर्स वन’चे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांची मंगळवारी मुंबई पोलीस दलाच्या सहआयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली

गुन्हे अन्वेषणच्या प्रमुखपदी सक्सेना
मुंबई : १९९३च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आणि ‘फोर्स वन’चे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांची मंगळवारी मुंबई पोलीस दलाच्या सहआयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली. कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सक्सेना यांनी यापूर्वी गुन्हे शाखेत काम केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीने मुंबई पोलीस दलातील आयुक्तांनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे हे सर्वांत महत्त्वाचे पद कोण भूषवणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सक्सेना यांचे पूर्वपदस्थ अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात दहशतवाद प्रतिबंधक पथकाचा (एटीएस) कार्यभार स्वीकारला. कुलकर्णी यांना या वर्षीच्या प्रारंभी अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली होती. पुढील आदेशापर्यंत त्यांना गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते. महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी यापुढे मुंबई
गुन्हे शाखेची धुरा सांभाळणार
आहे. (प्रतिनिधी)