शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?

By जितेंद्र ढवळे | Updated: November 17, 2024 08:05 IST

या मतदारसंघात लोकसभेत काँग्रेसचे बर्वे यांना १६,६०९  मतांची आघाडी होती तर २०१९च्या विधानसभेत केदार यांना २६,२९१ मतांची आघाडी होती.

जितेंद्र ढवळे,सावनेर Maharashtra Vidhan Sabha 2024: २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्याच्या लढाईने काटोलची निवडणूक राज्यभरात गाजली. आता भाजपचे डॉ. आशिष देशमुख, त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांच्या लढतीने सावनेर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. देशमुख भावंडे आपसात लढत असले तरी सावनेरमध्ये खरा मुकाबला हा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा होताना दिसतो आहे.

जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांना यावेळी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा यांना काँग्रेसने संधी दिली आहे. केदार यांच्या सावनेरमधील प्रस्थाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा डॉ. आशिष देशमुख यांच्यावर विश्वास टाकला आहे. २००९ मध्ये आशिष देशमुख यांनी केदार यांना घाम फोडला होता. अवघ्या ३,४७२ मतांनी देशमुख यांचा पराभव झाला होता. यावेळी सावनेरचा मामला टफ झाला आहे. येथे १९ उमेदवार रिंगणात आहेत. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

जिल्हा बँक घोटाळ्यात केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात यावी, हा मुद्दा घेत टीम भाजप मैदानात उतरली आहे. 

१,६०,११४ महिला मतदार असलेल्या या मतदारसंघात ९० हजार महिलांना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सावनेरचा निकाल फिरवतील, असा भाजपचा विश्वास आहे. 

या मतदारसंघात लोकसभेत काँग्रेसचे बर्वे यांना १६,६०९  मतांची आघाडी होती तर २०१९च्या विधानसभेत केदार यांना २६,२९१ मतांची आघाडी होती. काँग्रेसच्या मतांचा ग्राफ घसरलेला दिसतो आहे. रामटेकमध्ये झालेल्या बंडामुळे उद्धवसेना येथे अंतर राखून आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४savner-acसावनेरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी