सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली

By Admin | Updated: August 4, 2016 11:51 IST2016-08-04T11:29:42+5:302016-08-04T11:51:38+5:30

महाडच्या सावित्री नदीमध्ये शोधकार्यामध्ये गुंतलेल्या एनडीआरएफच्या जवानांची बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.

Savitri's fleet of fast-tracked passengers got off the boat | सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली

सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली

ऑनलाइन लोकमत 

महाड, दि. ४ - महाडच्या सावित्री नदीमध्ये शोधकार्यामध्ये गुंतलेल्या एनडीआरएफच्या जवानांची बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.
 
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सावित्री नदीमधील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही बोट कलंडली. महाबळेश्वर आणि महाडमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरु राहिल्याने सावित्रीच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही. 
 
आणखी वाचा 
 
महाबळेश्वरमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दुपारी सावित्रीच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. पाण्याच्या प्रवाहामुळेच पाण्याखालची शोध मोहिम सध्या शक्तीशाली चुंबकाच्या मदतीने केली जात आहे. 

Web Title: Savitri's fleet of fast-tracked passengers got off the boat