शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:11 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये. त्यांनी स्वत: शिकून महिलांना शिक्षणाचा हक्क दिला हे जरी त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य मानलं जातं असलं तरी त्यांनी कवियित्री म्हणूनही मोठं योगदान दिलं आहे. 

सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले’ आणि ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ असे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ‘काव्यफुले’ हा १८५४ साली, तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला होता. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम, करुणा, सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना दिसते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही कविता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

तयास मानव म्हणावे का?

ज्ञान नाही विद्या नाहीते घेणेची गोडी नाहीबुद्धी असुनि चालत नाहीतयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काहीपशूही ऐसे बोलत नाहीविचार ना आचार नाहीतयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाहीततयांच्या खाण्यासाठीहीना करी तो उद्योग काहीतयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाहीमदत न मिळे कोणाचीहीपर्वा न करी कशाचीहीतयास मानव म्हणावे का?

दुसऱ्यास मदत नाहीसेवा त्याग दया माया नाहीजयापाशी सदगुण नाहीतयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकहीस्वर्ग नरकाच्या कल्पनाहीपशुत नाही त्या जो पाहीतयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राहीऐतोबा हा खात राहीपशू पक्षात ऐसे नाहीतयास मानव म्हणावे का?

पशु-पक्षी माकड माणुसहीजन्ममृत्यु सर्वा नाहीयाचे ज्ञान जराही नाहीतयास मानव म्हणावे का?...................................................‘ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार)’ ‘माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।। जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट)’............................................................‘ज्योतिबांचे बोल। मनात परसा जीवाचा आरसा। पाहते मी सेवेच्या भावाने। सेवा जे करती धन्यता पावती। मानवात’..........................................................‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ ‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा’.........................................................‘शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती। जन्मी या फेडती शूद्र सारे विषम रचती समाजाची रीती धूर्ताची ही नीती। अमानव...’ (मनू म्हणे) ‘दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले ब्रह्मविहित सेवेचे। भू - देवांनी पछाडले (शूद्राचे दुखणे)’ ......................................................‘पिवळा चाफा रंग हळदीचा फुलला होता हृदयी बसतो (पिवळा चाफा)’ ‘फुल जाई पहात असता ते मज पाही मुरका घेऊन (जाईचे फूल)’ ....................................‘पुढे पेशवाई तिचे राज्य आले अनाचार देखी अती शूद्र भ्याले स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते खुणा नाश या ढुंगणी झाप होते’ (पेशवाई) ............................................. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षक