सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:24 IST2017-01-04T01:24:37+5:302017-01-04T01:24:37+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Savitribai Fule greetings in Mantralaya | सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Savitribai Fule greetings in Mantralaya