शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘सेव्ह दि मेरिट’ चळवळ पुन्हा सक्रिय; मराठा आरक्षणानंतर पालक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:38 IST

कुठल्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेतच राहायला हवे, अशी मागणी करत हे पालक सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

- रेश्मा शिवडेकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजा’करिता (एसईबीसी) लागू करण्यात आलेल्या शिंदेप्रणीत युती सरकारच्या १० टक्के आरक्षणाच्या निर्णयाविरोधात राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशोच्छुक विद्यार्थी-पालकांची ‘सेव्ह दि मेरिट’ ही चळवळ पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.

कुठल्याही परिस्थितीत आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेतच राहायला हवे, अशी मागणी करत हे पालक सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयीन लढ्याकरिता राज्य सरकारच्या नामांकित वकिलांच्या फौजेला तोंड देऊ शकेल अशा तज्ज्ञ कायदेतज्ज्ञांची जमवाजमव पालक करत आहेत. वकिलांच्या फी करिता फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पैसे जमा केले जात आहेत. न्य़ायालयीन लढ्यासोबतच गरज भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारीही पालकांनी ठेवली आहे.

गैरमार्गाने उत्पन्न प्रमाणपत्रईडब्ल्यूएस कोट्याकरिता आठ लाखांची उत्पन्न मर्यादा आहे. एकतर ही मर्यादा जास्त आहे. त्यात अनेक पालक गैरप्रकार करून उत्पन्न प्रमाणपत्र मिळवत आहेत आणि या कोट्यातील जागा बळकावत आहेत. आमच्यासारखे नोकरदार आणि प्रामाणिकपणे प्रवेश मिळवून इच्छिणाऱ्या पालकांची मुले मात्र भरडली जात आहेत. त्यामुळे आमचा विरोध १० टक्के ईडब्ल्यूएस कोट्यालाही आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या पालकांच्या वतीने डॉ. उदय डोपळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

१० टक्के ईडब्ल्यूएस कोट्यालाही विरोध२०१९ साली मराठा आरक्षणाचा निर्णय लागू झाला तेव्हा पालक या चळवळीच्या माध्यमातून एकवटले होते. आताही लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पालकांची ‘सेव्ह दि मेरिट’ ही चळवळ पुन्हा सक्रिय झाली आहे. राज्य सरकारच्या १० टक्के मराठा आरक्षणाबरोबरच केंद्र सरकारने २०१९च्या निवडणुका तोंडावर असताना आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता (ईडब्ल्यूएस) लागू केलेल्या १० टक्के कोट्याविरोधातही पालक रोष व्यक्त करत आहेत. कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाने ५० टक्क्यांची सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली मर्यादा ओलांडू नये, असे पालकांचे म्हणणे आहे.

वैद्यकीय प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचा पुढाकारआरक्षणाची मर्यादा राज्यात ७२ टक्क्यांपर्यंत गेल्याने वैद्यकीयच्या खुल्या गटासाठीच्या जागा मोठ्या संख्येने कमी होणार आहेत. त्यामुळे २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांत वैद्यकीयच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांचा गट या चळवळीत सक्रीय आहे. काही अभियांत्रिकी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे पालकही याचिकादार म्हणून न्यायालयीन लढ्यास सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय