बोअरमध्ये पडलेल्या चिमुरडीला वाचविले

By Admin | Updated: September 19, 2015 22:44 IST2015-09-19T22:44:46+5:302015-09-19T22:44:46+5:30

उघड्या बोअरमध्ये पडलेल्या ३वर्षीय चिमुरडीला ग्रामस्थांसह प्रशासनाच्या सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले.

Save the chimer in the boar | बोअरमध्ये पडलेल्या चिमुरडीला वाचविले

बोअरमध्ये पडलेल्या चिमुरडीला वाचविले

चांदा (जि़ अहमदनगर) : उघड्या बोअरमध्ये पडलेल्या ३वर्षीय चिमुरडीला ग्रामस्थांसह प्रशासनाच्या सव्वा तासाच्या अथक परिश्रमानंतर वाचवण्यात यश आले.
शनिवारी सकाळी अंगणवाडीत जाताना श्रेया रवींद्र गायकवाड (३) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उघड्या बोअरमध्ये पडली़ घराबाहेर उभ्या असलेल्या तिच्या पालकांनी श्रेयाला बोअरमध्ये पडताना पाहिले आणि तिच्याकडे धाव घेतली़ श्रेया हळूहळू खाली सरकत होती़ पालकांनी तिला वाचविण्यासाठी बोअरमध्ये हात घालून पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला़
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन जेसीबी बोलावण्यात आले़ त्यानंतर बोअरच्या बाजूने उकरण्यास सुरुवात झाली. पोलिसांसह तहसीलदार हेमलता बडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या़ श्रेया, सुमारे १२ फूट खोलवर बोअरमध्ये अडकलेली होती़ तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते़ जेसीबीच्या साहाय्याने बोअरला समांतर १२ फुटांपर्यंत खड्डे खोदून श्रेयाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले़
जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी होती. डॉ़ बीक़े.शिरसाट यांनी बोअरमध्ये अडकलेल्या श्रेयाला आॅक्सिजन पुरविला़ बोअरमधून काढल्यानंतर श्रेयाला बोलता येत नव्हते़ डॉ़ शिरसाट यांनी प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ सायंकाळपर्यंत श्रेया बोलू लागल्याचे डॉ़ नरेंद्र मुळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Save the chimer in the boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.