सत्यपाल महाराज यांना शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:18 IST2016-01-20T02:18:05+5:302016-01-20T02:18:05+5:30

सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना किर्तन क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार जाहीर.

Satyapal Maharaj received the Social Professor Award | सत्यपाल महाराज यांना शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार

सत्यपाल महाराज यांना शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार

आकोट (अकोला): आकोट येथील सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना किर्तन क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा समाजप्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना राज्यशासनाच्या सांस्कृतिक मंडळाच्यावतीने ३१ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला शिक्षणमंत्री तथा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आकोट येथील सत्यपाल महाराज हे आपल्या सप्तखंजेरीच्या माध्यमातून सातत्याने समाज प्रबोधन करीत आहे. विविध विषयांवर ते अहोरात्र समाजजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राज्यशासनाच्या सांस्कृतिक मंडळाच्यावतीने घेण्यात आली आहे. एक लाख रुपये,मानचिन्ह मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Web Title: Satyapal Maharaj received the Social Professor Award