सत्यपाल महाराज यांनी केले पत्नीचे देहदान
By Admin | Updated: June 5, 2015 23:47 IST2015-06-05T23:47:42+5:302015-06-05T23:47:42+5:30
सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांनी ठेवला आदर्श, मृत्यू नंतर केले त्यांच्या पत्नीचे देहदान.

सत्यपाल महाराज यांनी केले पत्नीचे देहदान
आकोट (अकोला ) : समाजप्रबोधनकार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी ५ जून रोजी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्नी सुनंदा यांच्या देहाचे दान केले. सुनंदा चिंचोळकर यांचे आकोटमध्ये ४ जूनच्या रात्री वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्य़ाने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव जिजामाता चौकातील गुरुवंदन या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सिरसोली गावासह परिसरातील नागरिकांनी दर्शन घेतले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना झाली, तर जिजाऊ वंदना देण्यात आली. यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, नागपूरचे ज्ञानेश्वर रक्षक, गाडेकर महाराज, शिवधर्माचे विदर्भ विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कोकाटे, अवि गांवडे, रामचंद्र बरेठिया, डॉ. तराळे, ठाणेदार कैलास नागरे यांच्यासह गुरुदेव परिवार व नागरिक उपस्थित होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता सुनंदा चिंचोळकर यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉ. फूलपाटील यांच्या चमूला सत्यपाल महाराज व मुलगा डॉ. धर्मपाल यांनी सुनंदा चिंचोळकर यांचा देह सुपूर्द केला. यावेळी नातेवाईक व परीट महासंघाचे राज्य अध्यक्ष बालाजी शिंदे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, मार्तंडराव माळी, मुकीम अहमद, अनंतराव गांवडे यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली दिली.