शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी होतील, त्यानंतर...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 18:48 IST

काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली.

मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला. या निवडणुकीत नागपूरची जागा विजयी करण्यात काँग्रेसला यश आले. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. अमरावती-औरंगाबाद इथं अटीतटीची लढत सुरू आहे. त्यात नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी होतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. 

अजित पवार यांनी सांगितले की, माझ्यासारख्यांनी काँग्रेसबद्दल बोलणं उचित नाही. एकेकाळी सत्यजित तांबे राज्यातील काँग्रेस युवकचे अध्यक्ष म्हणून बरीच वर्ष काम करत होते. पक्षाचा जवळचा कार्यकर्ता किंवा पक्षाशी बांधिलकी असणारा नवा चेहरा म्हणून पक्षाने जर उमेदवारी दिली असती तर असे काही घडले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सत्यजित तांबेंना अपक्ष उभे राहावे असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत निवडणुकीच्या काळात काही वेगळ्या प्रकारचा निर्णय त्याठिकाणी झाले. तांबे यांचे अख्खं घराणे, काँग्रेसच्या विचारधारेचे आहे. सुधीर तांबे हे आमदार होते. त्यामुळे सत्यजित तांबे सध्या आघाडीवर आहे. तेच निवडून येतील. त्यामुळे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील असं सांगत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना सल्ला दिला आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघात रंगलं नाट्य  विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. याठिकाणी काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर सुधीर तांबे मुलासह विभागीय कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. 

त्यानंतर काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपाने निवडणुकीत कुणालाही उमेदवारी दिली नाही. मतदानाच्या दिवशीपर्यंत भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र पडद्यामागून सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी भाजपा प्रयत्नशील होती असं म्हटलं जाते. त्यात महाविकास आघाडीने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती. सध्या मतमोजणीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. सत्यजित तांबेंचा विजय जवळपास निश्चित असल्याचं बोलले जात आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatyajit Tambeसत्यजित तांबे