शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची उमेदवारी वडिलांना, पण अर्ज भरला मुलानं! सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:00 IST

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन मोठा ट्विट पाहायला मिळत आहे.

नाशिक-विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन मोठा ट्विट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाकडून सुधीर तांबे यांच्यासाठीचा एबी फॉर्म देखील जारी करण्यात आला. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करुन आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. 

दरम्यान, पक्षाकडून एबी फॉर्मवर डॉ. सुधीर तांबे यांनाच जारी करण्यात आल्यानं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही आणखी एक अर्ज दाखल केला आहे. "सत्यजित तांबे युवा उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबतची कल्पना आहे. सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं होतं पण काही तांत्रिक चुकीमुळे आणि संवादातील त्रुटीमुळे एबी फॉर्म वेळात पोहोचू शकलेला नाही", असं कारण डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी दिलं आहे. 

पाठिंब्यासाठी सर्वपक्षीयांना विनंती करणार- सत्यजित तांबेआपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसंच या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले. "काँग्रेस पक्षातील पक्ष श्रेष्ठींचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. पक्षानं मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला एबी फॉर्म मिळू शकलेला नाही. त्यामुळे मी दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यानं मला अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे. असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून पाठिंब्याची विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या सीमेच्या पलिकडे जाऊन माझ्या पाठिशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न करणार आहे", असं सत्यजित तांबे म्हणाले. 

भाजपकडून उमेदवारीचीही सुरू होती चर्चायुवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पण सत्यजित तांबे यांनी या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगत पूर्णविराम दिला आणि काँग्रेस पक्षाचाच उमेदवार म्हणून फॉर्म भरल्याचं स्पष्ट केलं आहे. फक्त तांत्रिक कारणामुळे वेळेत पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं अपक्ष उमेदवार म्हणूनही एक फॉर्म भरावा लागला असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेस