सतभार पुण्यनगरीत

By Admin | Updated: June 21, 2014 23:29 IST2014-06-21T23:29:49+5:302014-06-21T23:29:49+5:30

संत तुकारामांची पालखी आकुर्डीवरून, तर ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आज दुपारी पुण्याकडे मार्गस्थ झाली. ‘

Satvaar Punya Nagar | सतभार पुण्यनगरीत

सतभार पुण्यनगरीत

>पुणो : प्रतिनिधी
होईन भिकारी, पंढरीचा वारकरी
हाचि माझा नेम धर्म, 
अवघे विठोबाचे नाम
हेचि माझी उपासना, 
लागन संतांच्या चरणा
तुका म्हणो देवा, 
करीन ती भोळी सेवा
असे अभंग गात संतभार आज पुण्यनगरीत दाखल झाला.  पुणोकरांनी तेवढय़ाच उत्साहाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह संतांच्या पालख्या आणि दिंडय़ांचे स्वागत के ले. सायंकाळी पाचच्या सुमारास तुकाराम महाराजांची, तर सहा वाजता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेटजवळील संगमपुलाजवळ आगमन झाले. 
महापालिकेतर्फे महापौर चंचला कोद्रे, आयुक्त विकास देशमुख, यांनी वारकरी भाविकांचे स्वागत केले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, नगरसेविका रेश्मा भोसले, सुनंदा गडाळे, आशा साने, पोलीस आयुक्त सतीशचंद्र माथूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संत तुकारामांची पालखी आकुर्डीवरून, तर ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आज दुपारी पुण्याकडे मार्गस्थ झाली. ‘मुखाने हरिनाम बोला’ म्हणत विठ्ठलभक्तांचा मेळा हळूहळू पुढे सरकत होता. भगव्या पताका आसमंतामध्ये उंच फडकत होत्या. टाळ-मृदंगाच्या तालावर हरिनामाच्या संगतीने वारकरी पांडुरंगाच्या भेटीची ओढ व्यक्त करीत होते. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, विणोच्या नादामध्ये तल्लीन झालेले विणोकरी, मुलांपासून वृद्धार्पयत टोपी घालून गंध-बुक्का लावलेले आणि अखंड हरिनामाचा गजर करणारे टाळकरी अशा जणू भक्तीचा मळा या परिक्र मेमध्ये फुलला होता.
पुण्यात दाखल होणारा हा सोहळा पाहण्यासाठी संगमवाडी, खडकी, दापोडीपासूनच नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. संचेती चौक,     फ ग्युर्सन रोडवर नागरिक पालख्यांची वाट पाहत बसून होते. 
 
4संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा नगारखाना 6 वाजता चौकामध्ये आला. त्यानंतर अध्र्या तासाने माऊलींचा पालखी रथ दाखल झाला. शांतपणो चालणारे वारकरी आणि अश्व, त्यामागे भालदार-चोपदार, नगारखाना, मानाच्या दिंडय़ा आणि शेवटी मुख्य रथ याप्रमाणो वारक:यांची शिस्त डोळ्यांत साठविली जात होती. चंदेरी नक्षीकाम असणा:या ज्ञानेश्वरांच्या रथाच्या आगमनानंतर ‘माऊली-माऊली..’चा जयजकार झाला आणि सर्वानी भक्तिभावाने माऊलींच्या चरणांचे दर्शन घेतले. माऊलींचा जयघोष ठायी..ठायी. ठेवू माथा तुकारामांच्या पायी, असा भाव दोन्ही पालख्यांबरोबर असणा:या वारक:यांच्या मनामध्ये साठत होता. फ ग्यरुसन रस्त्यावरील संत तुकाराम पादुका चौक आणि ज्ञानेश्वर पादुका चौक येथे आरत्या झाल्यानंतर दोन्ही पालख्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाल्या. 
4दुपारी दोननंतर पालख्यांचा वेग असल्याने लवकरच त्या पुण्यात येतील, अशी बातमी नागरिकांमध्ये पसरली. मात्र, दर वर्षीप्रमाणोच यंदाही पालख्यांचे आगमन सहाच्या सुमारास झाले. ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत भगव्या पताका आणि टाळमृदंगाच्या संगतीने एकेक पाऊल पुढे टाकीत संतभार पुण्यनगरीत दाखल झाला. सायंकाळी पाच वाजता तुकारामांच्या पालखीचा नगारखाना पाटील इस्टेट चौकात आला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी तुकारामांची पालखी आली. त्या वेळी तुकारामांच्या जयजकारात आसमंत दणाणून गेला. आकर्षक फुलांनी सजविलेला तुकारामांचा रथ लक्ष वेधून घेत होता. 
 
लक्ष लक्ष डोळ्यांनी घेतले पालख्यांचे दर्शन
4विठुरायाचे दर्शनाची ओढ लागलेल्या वारक-यांचे स्वागत करण्यासाठी आणि माऊली-तुकोबारायांच्या दर्शनासाठी आलेल्या पुणोकरांनी पादुकांचे दर्शन घेतले. वर्षभरातून एकदाच साजरा होणारा हा सोहळा डोळ्यात साठवण्याकरीता चिमुकल्यांपासून ते वृद्धांपासून शेकडो पुणोकरांनी हजेरी लावली. 
4दोन्ही पालख्यांचे फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकात आगमन झाल्यानंतर एकच गजर झाला. पालख्या विसाव्याकडे मार्गस्थ होताना लक्ष लक्ष डोळ्यांनी पालख्यांचे दर्शन घेतले. 
4संचेती चौकामध्ये संध्याकाळी 5.3क् वाजता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. ‘ज्ञानोबा माऊली- तुकाराम’च्या गजरात पुणोकारांनी पादुकांचे दर्शन घेतले. ठिकठिकाणी उभ्या असलेल्या सामाजिक संस्थांनी पुष्पवृष्टी करुन पालखीचे स्वागत केले. प्रत्येकाच्या मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’ हा एकच शब्द ऐकू येत होता.  मानाचे अश्व, विणोकरी, टाळ-मृदुंग वाजविणारे वारकरी आणि पालखी असे चित्र डोळ्यात साठविण्याकरीता रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली. ज्ञानेश्वर पादुका चौक आणि तुकाराम पादुका चौकात आरती झाल्यानंतर पालखी विसाव्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. संध्याकाळी उशीरा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कृषी महाविद्यालयाजवळ येताच ‘माऊली माऊली’चा एकच गजर झाला. 
4तुकोबारायांची पालखी 7 वाजता तुकाराम पादुका चौकातून पुढे गेल्यावर अवघ्या अध्र्या तासात माऊलींची पालखी आली. तुकाराम पादुका चौकात पाच मिनीटांकरीता पालखी विसावली. तेथून विसाव्याच्या ठिकाणी मार्गस्थ झाली. फग्र्युसन महाविद्यालय रस्ता-खंडुजीबाबा चौक-टिळक चौकामार्गे या पालख्या पुढे सरकल्या. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडयुंग्या विठोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली. 

Web Title: Satvaar Punya Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.