साताऱ्यात जनक्षोभ!

By Admin | Updated: July 30, 2016 04:01 IST2016-07-30T04:01:05+5:302016-07-30T04:01:05+5:30

कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी संतोष

Satkhara publicপাঠে! | साताऱ्यात जनक्षोभ!

साताऱ्यात जनक्षोभ!

वाठार स्टेशन (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी संतोष आबासाहेब भोईटे (वय ४६) याला वाठार स्टेशन पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र, या वेळी पोलीस ठाण्यासमोर संतप्त जमावातील एकाने आरोपीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने अनर्थ टळला. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित बालिकेचे आई-वडील, आजी पंचक्रोशीत मोलमजुरी करतात. मुलीचे आई-वडील गुरुवारी पहाटे वाई तालुक्यातील एका गावात मजुरीसाठी गेले होते. आजी गावातीलच शेतात भांगलणीसाठी गेली होती. तिच्याबरोबर ती चिमुरडीही होती. काम संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता शेतमालकाने स्वत:ची मुलगी अन् पीडित मुलीला मोटारसायकलवरून गावात आणले. तिला घरी सोडून ते निघून गेले. दरम्यान, संतोष भोईटे त्याच्या शेताकडे चालत निघाला होता. त्याने आजीची वाट पाहत असलेल्या मुलीला बोलावून हातात १० रुपये देत ‘चल, तुला चॉकलेट देतो,’ असे सांगितले. तिला घराच्या पाठीमागे असलेल्या छपरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो निघून गेला.
वेदना असह्य झाल्याने संबंधित मुलगी रडत रस्त्याकडे आली आणि आजीची वाट पाहत रडू लागली. आई आणि आजी घरात आल्यानंतर त्यांना तिने झालेला प्रकार सांगितला. आई-आजीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने दवाखान्यात धाव घेतली. प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात हलविले. संबंधित बालिकेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संतोष भोईटे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. (वार्ताहर)

जमावाची पोलीस ठाण्यावर ‘चाल’!
चिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थांनी वाठार पोलीस ठाण्यावर चाल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले होते. मात्र, आरोपीला न्यायालयात नेताना त्याच्यावर जमावाने पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव करून जमावाला पांगविले. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

अत्याचारानंतर आरोपी आरतीमध्ये दंग!
भयानक कृत्य करूनही संतोष भोईटे यांच्यावर कसलाही परिणाम झालेला नव्हता. अत्याचार केल्यानंतर गावातील एका मंदिरात आरतीला तो उपस्थित होता. त्यानंतर गावातही फिरला. रात्री ८ वाजता घरी जाऊन काही न घडल्याच्या अविर्भावात तो जेवत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Satkhara publicপাঠে!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.