ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक (एसीबी) सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित लवकरच निवृत्त होणार असून माथूर यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याचे समजते.
अवघ्या काही महिन्यांपूर्वीच, फेब्रुवारीमध्ये माथूर यांच्याकडे एसीबीचे संचालकपद सोपवण्यात आले होते.