शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

राजकीय उंदीर-उड्या पाहून खऱ्याखुऱ्या उंदरांचं अधिवेशन भरतं तेव्हा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 02:53 IST

अखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं.

- सचिन जवळकोटेअखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं. आजकाल गल्लीतल्या कॉलेजच्या वर्गातही जशी राष्ट्रीय परिषद भरविली जाते, तसाच काहीसा हा प्रकार. अकरा दिवसांची मंडपातली ड्यूटी संपवून ‘बाप्पा’ गावी गेल्यामुळं हे सारे उंदीर बांधवही सध्या निवांतच होते. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आयाराम-गयारामांची वर्दळ वाढल्यानंतर ‘उंदरांची नाहक बदनामी’ सुरू झाल्याचा साक्षात्कार एकाला झालेला. त्यापायी त्यानं पुढाकार घेऊन हे तातडीचं अधिवेशन बोलाविलेलं. दिव्याची वात कुरतडून उद्घाटन सोहळा संपन्न जाहला.संयोजक उंदरानं प्रास्ताविक सुरू केलं, ‘मूषक बांधवहोऽऽऽ मराठी माणसाच्या घरात वर्षभर आपल्याला झाडूखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भाद्रपद महिन्यात हीच मंडळी कौतुकानं आपली पूजा करतात. अकरा दिवस आपल्याला नैवेद्यही देतात. तरीही आपल्या जातभार्इंची बदनामी करण्याची मोहीम सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू झालीय. धरणं अन् कालव्यातली माती भुसभुशीत करणारे वेगळेच, मात्र त्याचं खापरही आपल्याच डोक्यावर फोडलं जातंय. जहाजातून उड्या मारणाऱ्या उंदरांशी राजकारणातल्या गयारामांचा संबंध जोडून आपल्या भावना नाहक दुखावल्या जाताहेत. तेव्हा आजच्या अधिवेशनात एकमुखानं याचा निषेध करू याऽऽ’.. मग काय, चिऽचीऽऽऽ आवाज करत निषेध नोंदविला गेला.अधिवेशनाचे अध्यक्ष ‘प्रथम उडीमारे’ बोलायला उभारले, ‘जहाजात खालच्या बाजूला आपण बिळं तयार करून ठेवली होती म्हणूनच जहाज बुडू लागलेलं. तेव्हा अधिक बिळं तयार होऊ नयेत म्हणून उंदरांनी जहाज वाचविण्यासाठीच स्वत:चं भवितव्य धोक्यात घातलेलं. खरंतर बुडत्या जहाजातून उडी मारणाºया उंदरांची ही कृती स्वार्थीपणाची नसून उलट त्यागाचंच प्रतीक आहे. ज्याचा तळ आजपावेतो भल्या-भल्यांना समजलेला नाही, अशा अथांग ‘लोटस्’ समुद्रात उडी घेणाºया उंदरांचा उलट गौरवच व्हायला हवा,’ तीनशे रुपये देऊन सभेत बसविलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांकडूनही पडल्या नसतील एवढ्या जोरात टाळ्या वाजल्या.सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या भोजनाचा सोहळा रंगला. काही सिनियर उंदरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली. कारण, जहाजातून उडी मारण्याच्या क्रांतिकारी चळवळीतले ते आद्य पुरुष होते. पुढं काय होणार हे त्यांना इतर बांधवांपेक्षा खूप अगोदर लक्षात येत असतं म्हणे.. म्हणूनच ‘लोकसभा’वेळी यांनी आपली अदाकारी दाखविलेली. पलीकडं बसलेले दोन ‘गलेलठ्ठ’ उंदीर कुजबूजत होते, ‘शेतकऱ्यांची साखर खाऊन पोट भलतंच टम्म झालंय बुवा आपलं. आता इकडून-तिकडं उड्या मारायला बायकोनंच सांगितलंय,’ असं एक जण म्हणताच दुसरा पुटपुटला, ‘ईडीची कागदं चघळल्यानं मलाही कळ लागलेली. तेव्हा कमळाच्या पाकळ्या हुंगण्याचा सल्ला माझ्या मित्रांनी दिलाय.’एवढ्यात पंगतीतल्या काही उंदरांचं ताट रिकामंच राहिल्याची चर्चा सुरू झाली. मुंबईच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हेलपाटे मारून-मारून थकलेल्या या उंदरांनी एकमेकांकडं मोठ्या केविलवाणेपणाने पाहिलं. ‘गेल्या एक महिन्यापासून आपल्याला विनाकारण खेळवलं जातंय,’ असंं त्यांना वाटू लागलेला भ्रम आता पक्क्या खात्रीत परावर्तीत झालेला. ‘साºयांच्याच ताटात तुकडे फेकले गेलेत. मग आपणच उपाशी का?’ असं एकानं विचारताच दुसरा हळूच कानात कुजबुजला, ‘पितृपक्ष सुरू आहे ना. आपल्या वाट्याचं म्हणे अगोदर कावळ्यांना देणार. तिथं शिल्लक राहिलं तर आपल्याला मिळणार !’ हे ऐकताच या अतृप्त उंदरांची चुळबुळ सुरू झाली. ‘एवढा घातक असेल पितृपक्ष, तर परवडला आपला जुनाच मातृपक्ष,’ म्हणत पुन्हा आपल्या घरी परतण्याची काही जणांनी तयारी सुरू केली. जय उंदीरऽऽ जय उडीमारे !

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019