साठे महामंडळातील घोटाळा २५० कोटींहून अधिक!
By Admin | Updated: May 16, 2015 03:09 IST2015-05-16T03:09:40+5:302015-05-16T03:09:40+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची ८० कोटी रुपयांची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गडप केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने

साठे महामंडळातील घोटाळा २५० कोटींहून अधिक!
यदु जोशी, मुंबई
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची ८० कोटी रुपयांची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गडप केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर समाजकल्याण खात्यात एकच खळबळ उडाली. हा घोटाळा सुमारे २५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या महामंडळातील घोटाळ्यांची अधिक चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम महामंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर कदम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत.
कोणतीही जाहिरात, मुलाखती, लेखी परीक्षा न घेता या महामंडळात ७३ जणांची एकाच दिवशी भरती करण्यात आली. त्यांना तत्काळ नियुक्तीचे पत्र देऊन प्रत्येकाला २० लाख रुपयांचे गृहकर्ज देऊन त्यातील प्रत्येकी १५ लाख रुपये नोकरी देण्यासाठीची रक्कम म्हणून उकळण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही रक्कम एकूण साडेआठ कोटी रुपये होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यभरात टीकेचे सूर उमटले होते.