सातारा : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू !

By Admin | Updated: May 5, 2016 18:20 IST2016-05-05T18:20:54+5:302016-05-05T18:20:54+5:30

क-हाड तालुक्यातील सवादे येथील ह्यबेलदराह्ण नावच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला

Satara: death of leopard death! | सातारा : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू !

सातारा : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू !

ऑनलाइन लोकमत
सातारा. दि. ५ :- क-हाड तालुक्यातील सवादे येथील ह्यबेलदराह्ण नावच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केली आहे. कोरड्या पाझर तलावापासून काही अंतरावर पंचनाम्याचे सोपस्कार उरकल्यानंतर सायंकाळी बिबट्याचा मृतदेह क-हाडला शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिका-यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला असल्याचे निदर्शनास आले. तसेच मृत्युपूर्वी त्याने उलट्या केल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला आहे. संबंधित चार महिन्यांचा बछडा मादी आहे.⁠⁠⁠⁠

Web Title: Satara: death of leopard death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.