साता-यात शिवसैनिकांनी 'बजरंगी भाईजान'चा शो बंद पाडला
By Admin | Updated: July 26, 2015 14:46 IST2015-07-26T14:46:34+5:302015-07-26T14:46:34+5:30
याकूब मेमनच्या समर्थनार्थ ट्विट करणा-या सलमान खानला आता चांगलेच महागात पडले असून सातारा येथे संतप्त शिवसैनिकांनी सलमानच्या पोस्टरला काळं फासत 'बजरंगी भाईजान' य चित्रपटाचा शो बंद पाडला.

साता-यात शिवसैनिकांनी 'बजरंगी भाईजान'चा शो बंद पाडला
>ऑनलाइन लोकमत
सातारा/ मुंबई, दि. २६ - याकूब मेमनच्या समर्थनार्थ ट्विट करणा-या सलमान खानला आता चांगलेच महागात पडले असून सातारा येथे संतप्त शिवसैनिकांनी सलमानच्या पोस्टरला काळं फासत 'बजरंगी भाईजान' य चित्रपटाचा शो बंद पाडला.
रविवारी सलमान खानने ट्विटरद्वारे याकूब मेमनला समर्थन दर्शवत याकूबऐवजी त्याचा भाऊ टायगर मेमनला फाशी द्या अशी मुक्ताफळं उधळली आहेत. सलमानच्या या ट्विटविरोधात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याकूब मेमनसारख्या गुन्हेगाराचे समर्थन करणा-यांनाही शिक्षा व्हायला हवी असे परखड मत एकनाथ खडसे व योगगुरु बाबा रामदेव यांनी मांडले आहे. तर शिवसेनेनेही सलमानच्या वक्तव्याचा विरोध दर्शवला आहे. सातारा येथे संतप्त शिवसैनिकांनी राजलक्ष्मी चित्रपटगृहात जाऊन सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाचा खेळ बंद पाडला. कार्यकर्त्यांनी सलमानच्या पोस्टरला काळं फासून राग व्यक्त केला.