शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:13 IST

अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व  विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत.

नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने आता जोर पकडला आहे. साहित्यिक वर्तुळात सध्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव आघाडीवर असून, कृतिशील लेखक अनिल अवचट यांच्या नावाच्या चर्चेलादेखील बहर आलेला आहे. अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर २३ जानेवारीला सर्व विभागीय प्रतिनिधी आणि महामंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीत चर्चा आणि विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणेसाठी अजून आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नवकथेची सारी वैशिष्ट्ये  त्यांनी आत्मसात केली आहेत. 

अनिल अवचट यांनाही वाढता प्रतिसाद -साहित्यिक अनिल अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. १९६९मध्ये त्यांनी ‘पूर्णिया’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची २२ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे.ते पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत.  डॉ. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.

शोभणे, शहाणे, भवाळकर, नारळीकर यांचीही चर्चा -रवींद्र शोभणे, जयंत नारळीकर यांच्या नावांचीही चर्चा आहे.  तर नाशिकचे आजोळ असलेल्या तारा भवाळकर आणि नाशिक हीच कर्मभूमी असलेल्या मनोहर शहाणे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

 

 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMaharashtraमहाराष्ट्र