सरसंघचालक सुवर्णनगरीत...

By Admin | Updated: May 14, 2014 00:57 IST2014-05-14T00:57:26+5:302014-05-14T00:57:26+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशिक्षा वर्गाला उपस्थिती देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंगळवारी रात्री जळगावात आगमन झाले.

Sarsanghchalak gold jewelery ... | सरसंघचालक सुवर्णनगरीत...

सरसंघचालक सुवर्णनगरीत...

्र  जळगाव- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशिक्षा वर्गाला उपस्थिती देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता आझाद हिंद एक्स्प्रेसने जळगावात आगमन झाले. या वेळी कडेकोट सुरक्षेत ते सावखेडा येथील शिबिराच्या ठिकाणी दाखल झाले. सावखेडा शिवारातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळेच्या वास्तूत आणि प्रांगणात सकाळी ४ ते रात्री १० या वेळात हा निवासी वर्ग सुरू आहे. या वर्गाला उपस्थिती देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत हे मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आझाद हिंद एक्स्प्रेसने जळगावात दाखल झाले. या वेळी त्यांच्या स्वागतासाठी क्षेत्रीय प्रमुख सुनीलराव देशपांडे, विजय पुराणिक, शरदराव ढोले, जिल्हा संघचालक प्रदीप केतकर, बजरंग दलाचे ललित चौधरी, जिल्हा शारीरिक प्रमुख अनिल सोनवणे, कवी कासार, संजय जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. झेड सुरक्षेत ते रेल्वे स्टेशनजवळील वाहनांच्या ताफ्यातील एमएच १९ एएक्स ७६०० या कारमध्ये बसून सावखेडा येथील शिबिराच्या ठिकाणी रवाना झाले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवडक पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

Web Title: Sarsanghchalak gold jewelery ...