शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 06:28 IST

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल.

मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणालाही आम्ही सोडणार नाही. कोणताही दबाव सीआयडी यंत्रणेवर कोणी आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांचे मारेकरी फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी योग्य कारवाई आम्ही करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल.

कराडविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करणार या प्रश्नात ते म्हणाले की ते पोलीस, सीआयडी ठरवतील. ते पोलिसांचे काम आहे. जे पुरावे आहेत त्यांच्या आधारे आम्ही कोणालाही सोडणार नाही. पोलिस वेळोवेळी योग्य निर्णय घेतील आणि माध्यमांना त्या विषयीची माहिती देतील.

कोणाकडे पुरावे असतील तर द्यावे -- आपल्यावर सूड उगविण्यासाठी आपल्याला गोवले जात आहे, असे कराड याने म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, कोण काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही. जिथे पुरावा आहे तिथे आम्ही कोणालाही सोडणार नाही. - आम्ही पुरावे गोळा करतच आहोत, आणखी कोणाकडे असतील तर तेही द्यावेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे. ज्यांना राजकारणच करायचे आहे त्यांना राजकारण लखलाभ असो. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडPoliceपोलिस