सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान !

By Admin | Updated: February 12, 2017 20:57 IST2017-02-12T20:57:18+5:302017-02-12T20:57:18+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा येथे शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आढळून आलेल्या अजगराला पकडून सर्पमित्रांनी जीवदान दिले.

Sarpamttar gave the life of the dragon! | सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान !

सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवदान !

ऑनलाइन लोकमत

मंगरुळपीर (वाशिम), दि. 12 - मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा येथे शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आढळून आलेल्या अजगराला पकडून सर्पमित्रांनी जीवदान दिले. सायखेडा येथे अजगर आढळल्याने मंगरूळपीर येथील सर्पमित्र गौरव अरुण इंगळे यांना फोनवरून माहिती देण्यात आली. गौरव हा आपल्या मित्रासह सायखेड्यात पोहोचला. शनिवारी रात्री १२ वाजताचे दरम्यान एका घराजवळ हा भला मोठा अजगर शिताफीने पकडला. तेथून मंगरुळपीर येथे एका पोत्यात घालून अजगराला आणण्यात आले. राधाकृष्ण नगरी येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी अजगर पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. सर्पमित्र गौरव इंगळे, आकाश खडसे, अनुप इंगळे यांनी पकडलेला हा अजगर ७ फूट लांब व १० किलो वजनाचा असून, इंडियन रॉक पायथॉन (मादी) जातीचा असल्याचे सांगितले.या अजगरास जंगलात सोडणार असल्याचे गौरव इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Sarpamttar gave the life of the dragon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.