सार्इंना ३० किलो चांदीचे सिंहासन

By Admin | Updated: November 2, 2016 08:03 IST2016-11-02T04:32:50+5:302016-11-02T08:03:36+5:30

एका भाविकाने मंगळवारी सार्इंना चांदीचे सिंहासन अर्पण केले़ या सिंहासनाचे वजन तीस किलो असून किंमत सुमारे अठरा लाख रुपये आहे़

Sareena 30 kg silver throne | सार्इंना ३० किलो चांदीचे सिंहासन

सार्इंना ३० किलो चांदीचे सिंहासन

ऑनलाइन लोकमत 
शिर्डी : दिवाळीचा मुहूर्त साधत गुजरात येथील एका भाविकाने मंगळवारी सार्इंना चांदीचे सिंहासन अर्पण केले़ या सिंहासनाचे वजन तीस किलो असून किंमत सुमारे अठरा लाख रुपये आहे.

बडोदा येथील जयस्वाल परिवारातील या भाविकाने मध्यान्ह आरतीनंतर समाधी मंदिरात बाबांना हे सिंहासन अर्पण केले़ या वेळी संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे व मंदिर प्रमुख विजय जगताप उपस्थित होते.

समाधी मंदिरात बाबांच्या मूर्तीला २००७ मध्ये सुवर्ण सिंहासन बसवण्यात आले असून आता हे चांदीचे सिंहासन बाबांच्या चावडी मंदिरात ठेवून त्यावर प्र्रतिमा ठेवण्यात येणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले़.

Web Title: Sareena 30 kg silver throne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.