आर्चीला पाहण्यासाठी अाबालवृद्धांची 'सैराट' गर्दी

By Admin | Updated: August 11, 2016 15:40 IST2016-08-11T13:27:13+5:302016-08-11T15:40:45+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडणा-या 'सैराट'चा प्रेक्षकांवरील फिव्हर अद्यापही उतरलेला नाही.

'Sarat' crowd of young people to see Archie | आर्चीला पाहण्यासाठी अाबालवृद्धांची 'सैराट' गर्दी

आर्चीला पाहण्यासाठी अाबालवृद्धांची 'सैराट' गर्दी

ऑनलाइन लोकमत 

विटा, दि. ११ - मराठी चित्रपटसृष्टीत उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडणा-या 'सैराट'चा प्रेक्षकांवरील फिव्हर अद्यापही उतरलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन महिने उलटल्यानंतरही प्रेक्षक परश्या आणि आर्चीच्या प्रेमात आहेत. 
 
गुरुवारी पुन्हा याची प्रचिती आली. रिंकू राजगुरु सांगली जिल्ह्यात विटा या गावात हॉटेलच्या उदघाटनासाठी येणार होते. मात्र ते येण्यापूर्वी रस्त्याच्या दुर्तफा अबालवुद्धांची तुफान गर्दी झाल्याने काहीवेळासाठी कराड-सोलापूर मार्ग बंद झाला होता. 
 
ज्या ठिकाणी हे हॉटेल आहे त्याच्या आसपासच्या परिसरातील इमारतींच्या गच्चीवर रिंकूची एक झलक पाहण्यासाठी लोक थांबले होते. सैराट प्रदर्शित झाल्यानंतर अार्चीने घेतलेला हा पहिला अनुभव नाही. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक भागात या जोडीला पाहण्यासाठी अशीच तोबा गर्दी उसळली होती. काहीवेळा गर्दीमुळे आयोजकांना कार्यक्रम रद्द करावा लागला होता. 
 

Web Title: 'Sarat' crowd of young people to see Archie