सारस्वतांचा मेळा यंदा डोंबिवलीत

By Admin | Updated: September 18, 2016 19:18 IST2016-09-18T19:18:53+5:302016-09-18T19:18:53+5:30

90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा डोंबिवलीत होणार आहे. नागपूरमध्ये 20 सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक

Saraswatra Mela this year is Dombivali | सारस्वतांचा मेळा यंदा डोंबिवलीत

सारस्वतांचा मेळा यंदा डोंबिवलीत

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.18- 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा डोंबिवलीत होणार आहे. नागपूरमध्ये 20 सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे, त्यावेळी श्रीपाद जोशी याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचं वृत्त आहे.

नुकतंच साहित्य महामंडळाचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथून विदर्भ साहित्य संघ, नागपूरकडे हस्तांतरित झाले. त्यामुळे संमेलन विदर्भात होणार की दुसरीकडे याबाबत उत्सुकता होती. 89 वे साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे पार पडले होते.  महामंडळाकडे एकूण सात निमंत्रणं आली होती. कल्याण, सातारा, चंद्रपूर,डोंबिवली,इंदापूर आणि बेळगाव याठिकाणांहून निमंत्रण आली होती, त्यापैकी डोंबिवलीची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Saraswatra Mela this year is Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.