सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी
By Admin | Updated: September 16, 2016 18:34 IST2016-09-16T18:34:28+5:302016-09-16T18:34:28+5:30
सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार

सैराट फेम आर्चीला पाहण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून तरूण जखमी
ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.16- सैराट फेम रिंकू राजगुरुला पाहण्याच्या नादात एका तरुणाला विजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा हात होरपळून निघाला आहे. नागपूरच्या हिलटॉप येथील गणपतीच्या दर्शनासाठी सैराट फेम आर्ची येणार असल्याने सकाळ पासूनच तौबा गर्दी उसळली होती. मिळेल त्या जागी उभं राहून आर्चीची एक झलक पाहण्यासाठी तरुण भिंतीवर,दुकानांवर,वाहनांवर उभे झाले होते.
अक्षय वैद्य नावाचा एक तरुण सुद्धा एका पडक्या दुकानावर उभा होता. उतरताना त्याने (डीपी) ट्रांसफार्मर चा सहारा घेतला...त्याच वेळी त्याला विजेचा जबर धक्का लागला. तो त्या डीपी ला चिटकला..त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राजन माने बंदोबस्त सांभाळत होते. त्यांच्या नजरेस हि घटना पडताच क्षणाचाही विलंब न करता ते काठी घेऊन डीपी जवळ पोहचले. काठीच्या मदतीने डिपीला चिटकलेल्या अक्षयला दूर केलं आणि तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. मानेनच्या समयसुचकते मुळेच अक्षयचा जीव वाचला.