सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळाविना मिळणार पूजेचं ताट
By Admin | Updated: February 14, 2017 12:24 IST2017-02-14T12:24:01+5:302017-02-14T12:24:01+5:30
अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात जाणा-या भाविकांना पूजेच्या ताटात श्रीफळ न नेताच लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यावं लागणार आहे

सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळाविना मिळणार पूजेचं ताट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात जाणा-या भाविकांना पूजेच्या ताटात श्रीफळ न नेताच लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. अंगारकी चतुर्थी असल्याने मुंबईसह जवळच्या पसिरातील गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनसाठी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी करत असतात. भाविकांची होणारी ही गर्दी पाहता सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेत श्रीफळ नेण्यास मनाई केली आहे.
मंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिरात होणा-या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही घातपात घडवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे..