शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

'सपकाळ यांनी पक्ष भाजपाला विकला', भिवंडीतील काँग्रेस नेत्याचा आरोप, थेट राहुल गांधींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:54 IST

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडामोडींना भिवंडीतील स्थानिक नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत आला तरी मुंबईजवळच्या भिवंडी महानगरपालिकेमधील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्रिशंकू निकाल लागलेला असल्याने आणि फोडाफोडीच्या राजकारणाला उत आल्याने भिवंडीमध्ये महापौरपदी कोण विराजमान होईल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडामोडींना भिवंडीतील स्थानिक नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी यावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांना सपाच्या आमदाराला हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला, असा आरोप मोमीन यांनी केला आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नव्हतं. येथे काँग्रेस हा ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने भिवंडीमध्ये इतर समविचारी पक्षांना घेऊन आघाडी करण्याची तयारी सुरू केली होती. त्यामधून सेक्युलर फ्रंट असा गट स्थाप झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपातील  ९ नगरसेवकांच्या एका गटानेही काँग्रेससोबत सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला, तसेच काँग्रेसने या गटातील नेते नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी उमेदवारी दिली. या माध्यमातून काँग्रेसने चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढल्याचे बोलले जात आहे.

मात्र काँग्रेसच्या राज्यस्तरावरील नेतृत्वाकडून घेण्यात आलेला हा निर्णय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या पचनी पडलेला नाही. पक्षाचे शहराध्यक्ष रशिद ताहिर मोमीन यांनी या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून भिवंडीमधील परिस्थितीची थेटपणे हाताळणी केली जात आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून आदेश देत आहेत, व्हीप काढत आहेत. जिल्हाध्यक्षांना कल्पना न देता न कळवता हे काम सुरू आहे. त्यामुळे भिवंडीमधील आमची पूर्ण कार्यकारिणी आणि कार्यकर्ते नाराज आहेत, असे मोमीन म्हणाले. 

यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष हा सपा आमदाराच्या मदतीने भाजपाला विकल्याचाही गंभीर आरोप केला. हा सर्व भाजपाचा डाव असून, त्यात आमचे लोक सहभागी आहेत, असा दावाही मोमीन यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress leader accuses Sapkal of selling party to BJP in Bhiwandi.

Web Summary : Bhiwandi Congress leader Rashid Momin accuses Harshvardhan Sapkal of selling the party to BJP with an SP MLA's help amid mayoral race turmoil. He directly complained to Rahul Gandhi about this deal, alleging the state leadership is favoring BJP's agenda.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपा