संतोष सिंह यांचे चांदिवलीत शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: October 9, 2014 04:12 IST2014-10-09T04:12:51+5:302014-10-09T04:12:51+5:30
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संतोष सिंह यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे

संतोष सिंह यांचे चांदिवलीत शक्तिप्रदर्शन
मुंबई : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संतोष सिंह यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. चांदिवलीतील सर्व शिवसैनिक त्यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या मतदारसंघात मतदारांना बदल हवा असून हक्काचा उमेदवार विधानसभेत पाठवण्यासाठी येथील माजी नगरसेवक हरीश शुक्ला आणि प्रभाग क्र. १५३च्या नगरसेविका लीना शुक्ला यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
नगरसेवकांसह हजारो समर्थक संतोष सिंग यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. संतोष सिंग यांनी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन केले. उत्तर भारतीय संघाचे मुंबई अध्यक्ष आर.एन. सिंह यांचे आमचे कौटुंबिक संबंध असून आपण या विधानसभा क्षेत्रात जाऊन प्रचार करणार असल्याचे हरीश शुक्ला आणि लीना शुक्ला प्रचार सभेत सांगितले. या वेळी उत्तर भारतीय संघ मुंबईचे अध्यक्ष आर.एन. सिंह, उत्तर भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय सिंह तसेच संतोष सिंह यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. (प्रतिनिधी)