निरपराध नागरिकांचा जीव घेणा-या संतोष मानेची फाशी कायम
By Admin | Updated: September 9, 2014 13:20 IST2014-09-09T13:20:18+5:302014-09-09T13:20:30+5:30
बेदकारपणे बस चालवत नऊ नागरिकांचा जीव घेणारा बसचालक संतोष मानेची फाशी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे

निरपराध नागरिकांचा जीव घेणा-या संतोष मानेची फाशी कायम
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बेदकारपणे बस चालवत नऊ नागरिकांचा जीव घेणारा बसचालक संतोष मानेची फाशी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. माने हा मनोरुग्ण असल्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावत त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले.
संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात बेदरकारपणे बस चालवत अनेक पादचा-यांना चिरडले होते, ज्यात ९ जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. त्यात अनेक गाड्यांचेही नुकसान झाले होते. या प्रकरणी २०१३ मध्ये सत्र न्यायलयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात माने उच्च न्यायालयात अपील केले. शिक्षा सुनावण्यापूर्वी मानेचे म्हणणे ऐकले नाही, या मुद्यावरून त्याती शिक्षा रद्द करण्यात आली. दोन महिन्यांत फेरसुनावणी घेऊन निकाल देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. फेरसुनावमीदरम्यान माने हा मनोरुग्ण असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत मानेच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.