संतोष माने हायकोर्टातही दोषी

By Admin | Updated: July 24, 2014 01:45 IST2014-07-24T01:45:06+5:302014-07-24T01:45:06+5:30

पुणो येथे एसटी महामंडळाची बस चोरून ती भरधाव चालवत नऊ जणांचा बळी घेणारा आरोपी संतोष माने याला उच्च न्यायालयाने या कृत्यासाठी बुधवारी दोषी ठरविल़े

Santosh Mane guilty in high court | संतोष माने हायकोर्टातही दोषी

संतोष माने हायकोर्टातही दोषी

मुंबई :  पुणो येथे एसटी महामंडळाची बस चोरून ती भरधाव चालवत नऊ जणांचा बळी घेणारा आरोपी संतोष माने याला उच्च न्यायालयाने या कृत्यासाठी बुधवारी दोषी ठरविल़े त्याच्या फाशीच्या शिक्षेवर येत्या 5 ऑगस्टला सुनावणी होणार आह़े
विशेष म्हणजे आपण वेडेपणात हे कृत्य केले असून, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले व या प्रकरणात अडकवले आह़े त्यामुळे यासाठी दोषी धरू नये, अशी मागणी माने याने न्यायालयाकडे केली होती़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली़ माने याने 25 जानेवारी 2क्12 रोजी हे कृत्य केल़े यात नऊ जणांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाल़े  यासाठी दोषी धरीत पुणो सत्र न्यायालयाने मानेला फाशीची शिक्षा ठोठावली़ याला माने याने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी शासनाने स्वतंत्र याचिका केली आह़े या दोन्ही याचिकांवर खंडपीठासमोर सुनावणी झाली़ (प्रतिनिधी)

 

Web Title: Santosh Mane guilty in high court