शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सांताक्लॉज राज्यात घेऊन येणार थंडीचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 08:00 IST

शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश नोंदविण्यात आले. किमान तापमान २३.४ अंश नोंदविण्यात आले.

मुंबई  : डिसेंबर महिन्यात राज्यात पडणाऱ्या थंडीपैकी सुरुवातीच्या १५ दिवसांतील थंडी मॅन-दौंस चक्रीवादळाने हिरावून घेतली असली तरी मंगळवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात १० अंशापर्यंत घट होईल. शिवाय दुपारचे कमाल तापमानाही २९ अंशांपर्यंत खाली उतरेल, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने थंडीच्या पुनरागमानची शक्यता वाढली आहे. विशेषत: डिसेंबर महिन्यातील उर्वरित १०-१२ दिवसांत म्हणजे नाताळदरम्यान थंडीत चांगलीच वाढ होण्याचा अंदाज असून, वर्षाअखेरपर्यंत थंडी टिकून राहणार आहे.

मॅन-दौंस चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानंतरच तसेच उत्तर भारतात एका पाठोमाग असलेल्या पश्चिमी झंजावाता (वेस्टर्न डिस्टरबन्सेस)च्या परिणामामुळेच महाराष्ट्रातील किमान व कमाल तापमान घसरत आहेत. सध्या ही दोन्ही तापमाने त्यांच्या सरासरी तापमानापेक्षा २ अंशाने वाढीव आहेत. त्यात घसरण होत रात्रीच्या थंडीत दिवसागणिक वाढ होईल.

दरम्यान, महाराष्ट्रासारखाच थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातमधील द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाडपर्यंतच्या २० जिल्ह्यात व  दक्षिण मध्यप्रदेशातीलह झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुलपर्यंतच्या २० जिल्ह्यांत जाणवू शकतो, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

थंडी का वाजत नाही ?शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश नोंदविण्यात आले. किमान तापमान २३.४ अंश नोंदविण्यात आले. हे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ अंशांनी अधिक होते. त्यामुळे मुंबईकरांना ऐन थंडीत उन्हाळा अनुभवास येत आहे, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरकडून देण्यात आली.

 ४ डिसेंबर १९८७ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.८ अंश होते. गेल्या दहा वर्षांत ३१ डिसेंबर २०१५ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३७.३ अंश होते. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.५ होते.(स्रोत : वेगरिज ऑफ दी वेदर) 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र