कोरोना रिअल इस्टेटला देणार संजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:12 AM2020-04-01T04:12:42+5:302020-04-01T04:12:50+5:30

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्र मंदीचा सामना करीत आहे.

Sanjeevani to give Corona real estate! | कोरोना रिअल इस्टेटला देणार संजीवनी!

कोरोना रिअल इस्टेटला देणार संजीवनी!

googlenewsNext

- अभय केले

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्व उद्योग-धंदे ठप्प असून, शेअरबाजार देखील कोसळला आहे. सोन्यातील गुंतवणूकदेखील कमी झाली आहे. साथीच्या रोगामुळे नागरिकांना आपल्या घराविषयी जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार वर्षांच्या कालावधीत रिअल इस्टेट उद्योगाला नवसंजीवनी मिळणार आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्र मंदीचा सामना करीत आहे. घरातील गुंतवणुकीमधून मिळणारा परतावा तुलनेने कमी झाला होता. या काळात अनेक कंपन्या म्युच्युअल फंडामध्ये उतरल्या. त्यांच्याकडून आक्रमकपणे चांगला परतावा मिळत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे. याच दरम्यान शेअर बाजाराने मोठी उसळी घेतल्याने म्युच्युअल फंडामधून चांगला परतावा मिळतो, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा म्युच्युअल फंडाकडे वळाला. या कंपन्यांनी कोट्यवधी रुपये बाजारातून उभारले. दुसरीकडे घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने राहणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळेही मागणीत काहीशी घट झाली.

म्युच्युअल फंडामधून परतावा मिळत असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला ओहोटी लागली. त्याच बरोबर सरकारची धोरणे देखील त्यास कारणीभूत आहेत. सध्या रिअल इस्टेटमध्ये पाच ते सात वर्षांपूर्वी असलेला परतावा आज मिळत आहे. महागाई निर्देशांकाची तुलना केल्यास ग्राहकांना ४० टक्के स्वस्त दराने आज घर उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर आता स्थिती वेगाने बदलत आहे. पर्यटन, विमान, हॉटेल आणि उत्पादन आधारित उद्योगांना फटका बसला आहे. जगभरातील शेअर बाजारही कोसळत आहेत. त्यामुळे त्यातील गुंतवणूक आता फारशी आकर्षक राहिली नाही. म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लानमध्ये (एसआयपी) कमी परतावा मिळत आहे. कोरोना विषाणूने पुकारलेल्या बंदमुळे कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले आहे.

पूर्वी झोप वगळता २ ते ३ तास घरात व्यक्ती असायची. आता १५ तास कार्यरत असते. त्यामुळे भाडेकरुंना स्वत:चे घर असावे, अशी भावना वाढीस लागली आहे. त्याचबरोबर आपले घर मोकळेढाकळे असावे, हवा खेळती रहावी, गृहसंस्थेतील अंतर्गत प्रशस्त असावेत अशी आशा लोक करु लागलेत. इतर गुंतवणुकीपेक्षा हक्काच्या घरामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल राहील. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) उचललेल्या पावलांमुळे गृह कर्ज ७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट गुंतवणुकीतून तीन-चार वर्षांत १५ टक्के परतावा मिळेल. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी देखील ग्राहकांची बदलती मागणी लक्षात घेऊन सदनिका बांधाव्यात.

Web Title: Sanjeevani to give Corona real estate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.