संजीव खन्नाचा जामीन अर्ज विशेष सीबीआयने फेटाळला
By Admin | Updated: July 30, 2016 02:32 IST2016-07-30T02:32:32+5:302016-07-30T02:32:32+5:30
शीना बोरा हत्याप्रकरणातील महत्त्वाचा आरोपी व इंद्राणी मुखर्जीचा आधीचा पती संजीव खन्नाचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला.

संजीव खन्नाचा जामीन अर्ज विशेष सीबीआयने फेटाळला
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील महत्त्वाचा आरोपी व इंद्राणी मुखर्जीचा आधीचा पती संजीव खन्नाचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला.
न्या. एच. एस. महाजन यांनी खन्नाच्या वकिलांचा आणि सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खन्नाची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. खन्नाने दाखल केलेल्या जामीन अर्जानुसार, पोलिसांच्याच म्हणण्यानुसार, इंद्राणीने शीनाला वांद्रे येथून संध्याकाळी ६:३० वाजता सोबत घेतले. त्या वेळी खन्ना नुकताच संध्याकाळी ६:०३ वाजता मुंबईतील एका हॉटेलमध्ये पोहोचला होता. ज्या वेळी इंद्राणीने शीनाला सोबत घेतले त्या वेळी त्याने जेवण आॅर्डर केले होते. वेटरने दिलेल्या बिलावर खन्नाची सही आहे. खन्ना घटनास्थळी नव्हता. त्याला नाहक या गुन्ह्यात गोवण्यात येत आहे. मात्र सीबीआयने संजीवच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. (प्रतिनिधी)